नाशिक शहरात गुरुवारी 13 पॉझिटिव्ह रुग्ण; 2 वर्षाच्या बालिकेचाही समावेश

नाशिक(प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (२८ मे २०२०) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नाशिक शहरातून एकूण १3 तर ओझर येथून १ रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात कामठवाडे- ५, पखाल रोड- १, दुध बाजार-१, अजमेरी चौक(जुने नाशिक)- १, श्रीराम नगर (जत्रा हॉटेल)- १, दत्त मंदिर (नाशिक रोड)- २, मुमताज नगर (वडाळा)-१, ओम नगर (माख्मालाबाद रोड)-१ यांचा समावेश आहे.

सविस्तर पुढीलप्रमाणे:

कामठवाडे येथील ४५ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, ५३ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय महिला, २६ वर्षीय पुरुष, पखालरोड (द्वारका) येथील २ वर्षीय बालिका, दुध बाजार येथील ३० वर्षीय पुरुष, अजमेरी चौक येथील ५४ वर्षीय पुरुष, श्रीराम नगर येथील ३३ वर्षीय पुरुष, दत्त मंदिर येथील ३९ वर्षीय महिला आणि १५ वर्षीय युवक आणि मुमताज नगर येथील १० वर्षीय मुलगी तर ओम नगर मखमलाबादरोड येथील ५१ वर्षीय पुरुष यांचा कोरोनाबाधीतांमध्ये समावेश आहे.