कोरोनाचा रुग्ण आढळल्याने म्हसरूळचा काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

नाशिक (प्रतिनिधी): काल (26 एप्रिल 2020) सुरगाणा येथील जो रुग्ण आढळला तो सध्या नाशिकच्या म्हसरूळ भागात वास्तव्यास आहे. त्यामुळे हा भाग प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. यामध्ये म्हसरूळ भागातील वृंदावन नगर आता बंद करण्यास सुरुवात झालेली आहे. सदर रुग्ण हा जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. त्यालाच बाधा झाल्याने यंत्रणा हादरली आहे.

हा प्रशिक्षणार्थी डॉक्टर या भागातील चित्रलेखा इमारतीत आपल्या काही सहकार्यांसोबत राहत होता. त्यामुळे आता त्या सहकाऱ्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.

प्रतिबंधित भागाचा नकाशा:

या भागातून कुणालाही बाहेर पडता येणार नाही किंवा बाहेरून आत येता येणार नाही.