नंदिनीचे रूपडे पालटणार; गॅबियन वॉल, सुशोभिकरणासाठी २० कोटी ३७ लाखांचा प्रस्ताव

महापालिकेने स्मार्ट सिटीला पाठविला ठराव, शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या मागणीला यश

नाशिक (प्रतिनिधी): नंदिनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी दोंदे पूल ते गोविंदनगरपर्यंत नदीच्या दोन्ही किनार्‍यांवर गॅबियन वॉल बांधून सुशोभिकरण करण्यासाठी २० कोटी ३७ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

त्याचा प्रशासकीय ठराव मंजूर करून तो महापालिकेने स्मार्ट सिटीकडे पाठविला आहे. यामुळे शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या मागणीला यश आले असून, हा महत्त्वकांक्षी प्रकल्प नंदिनीच्या जतन आणि संवर्धनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. गोदावरीचे प्रदूषण रोखण्यालाही मदत होणार आहे.

अतिक्रमण, सांडपाणी, घाण, कचरा यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होवून नंदिनी नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ही नदी शेवटी गोदावरी नदीला जावून मिळत असल्याने गोदावरीही प्रदूषित होते. नंदिनीचे पर्यायाने गोदावरीचे प्रदूषण थांबावे, यासाठी दोंदे पूल ते गोविंदनगर म्हणजेच मुंबई नाका सर्व्हिस रोडपर्यंत दोन्ही किनार्‍यांवर गॅबियन वॉल बांधण्यात यावी, सुशोभिकरण करावे, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने २३ मार्च २०२२ रोजी निवेदनाद्वारे महापालिका व स्मार्ट सिटी यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत प्रस्ताव आणि प्रशासकीय ठराव पाठवावा, असे स्मार्ट सिटीने ३१ मार्च रोजी महापालिकेला कळविले होते. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या सततच्या पाठपुराव्यानंतर दोंदे पूल ते गोविंदनगरपर्यंत खासगी जागा वगळून २० कोटी ३७ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी २७ मे २०२२ च्या प्रशासकीय महासभेवर या प्रस्तावाला मंजुरी दिली. ३१ मे २०२२ रोजी प्राप्त झालेला हा ४ क्रमांकाचा ठराव पुढील कार्यवाहीसाठी स्मार्ट सिटीकडे पाठविण्यात आला आहे.

सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, संजय टकले, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे विठ्ठलराव देवरे, मनोहर पाटील, राधाकृष्ण जाधव, सखाराम देवरे, गुलाबराव शिंदे, बापुराव पाटील, हिरालाल ठाकुर, दिलीप खोडके, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय डोंगरे, ओमप्रकाश शर्मा, स्नेहलता सोनवणे, भालचंद्र रत्नपारखी, बाळासाहेब देशमुख, अशोक पालवे, दिलीप दिवाणे, विनोद पोळ, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, मनोज पाटील, मनोज वाणी, मीना टकले, उज्ज्वला सोनजे, सुनीता उबाळे, शीतल गवळी, स्मिता गाढवे, रूपाली मुसळे, वंदना पाटील, प्रतिभा पाटील, चित्रा रौंदळ, अपर्णा खोत, सुलोचना पांडव, मिनाक्षी पाटील, डॉ. शशिकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. सुनिल चौधरी, डॉ. पराग सुपे, श्रीकांत नाईक, राजेंद्र कानडे, शैलेश महाजन, टी. टी. सोनवणे यांच्यासह रहिवाशांनी महापालिका व स्मार्ट सिटीचे आभार मानले आहेत.

नदी वाचविण्यासाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी:

नंदिनी नदी ही गोदावरी नदीलाच जावून मिळते, तिचे जतन, संवर्धन होईलच, पर्यायाने गोदावरीचेही प्रदूषण रोखण्यास या प्रकल्पाने मदत होणार आहे. या दोन्ही नद्यांच्या रक्षणासाठी व नाशिककरांच्या आरोग्यासाठी स्मार्ट सिटीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी प्रतिक्रिया शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांनी व्यक्त केली.