नाशिकमधील बिल्डींग्सवर उभारलेल्या बेकायदेशीर टॉवर्सवर होणार कारवाई !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका आता शहरातील बेकायदेशीर मोबाईल टॉवरविरोधात मोहीम उघडणार आहे. शहरातील अनेक मोठ्या बिल्डींग्सवर बेकायदेशीर पद्धतीने परवानगी न घेताच मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. असे टॉवर आता नाशिक महानगरपालिकेच्या रडारवर आहेत. या टॉवरचा शोध घेऊन दहा ते बारा कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे.

नाशिक शहरातील अनेक मोठ्या बिल्डींग्सवर महानगरपालिकेची परवानगी न घेता मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. हे टॉवर व्यावसायिक उपक्रमासाठी वापरले जातात. त्यामुळे नियमानुसार घरपट्टी ते नगररचना विभागाची अधिकृत परवानगी घेणे आवश्यक असते. याआधी जेव्हा नगररचना विभागाने परवानगी न घेता टॉवर उभारणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली, तेव्ह्या या कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. असे असतांनाच दुसरीकडे मोबाईल टॉवर नियामित्करण शुक्लापोती मिळणारी दहा कोटींची रक्कमही ठाकली आहे. खासगी एजन्सीच्या माध्यमातून याचं सर्वेक्षण करून अनधिकृत टॉवरवर तीस हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.