मालेगाव, सिन्नर आणि नाशिकरोड येथे कोरोनाबाधितांचा आकडा वाढला

नाशिक (प्रतिनिधी): मालेगावमध्ये शनिवारी (18 एप्रिल २०२०) एकूण 15 नवीन कोरोना पॉझिटिव्ह तर सिन्नरमध्ये अजून एक आणि नाशिकरोड येथे अजून एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याआधी नाशिक शहरात शनिवारी (18 एप्रिल २०२०) सातपूर अंबड लिंक रोड वरील अजून ४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. नाशिकरोड येथील रुग्णाचे अहवाल शनिवारी रात्री प्राप्त झाले. नाशिक शहराशी तुलना करता मालेगावच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. त्यामुळे मालेगावची चिंता आता वाढली आहे.