मालेगावची माणुसकी! – नाशिक व धुळ्यातील रुग्णांवर मालेगावात उपचार करण्यास तयार

नाशिक (प्रतिनिधी) : जागतिक पातळीवर विध्वंस करणाऱ्या या कोरोना महामारीच्या काळात आपण सर्वांनी एकजूट राहण्याची आणि त्यासोबतच माणुसकी दाखवण्याची सुद्धा गरज आहे. हे आपल्याला आज मालेगावने पटवून दिले आहे. मालेगावचे माजी आमदार रशीद शेख म्हणतात “आम्ही माणुसकी जपणारी लोकं असून नाशिक व धुळे येथील रुग्णांना मालेगावमध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यायला सज्ज आहोत.”

मालेगावात सध्या ३०० बेड्स रिक्त आहेत. त्यामुळे उपचार करणे सोयीस्कर होईल त्यामुळे हि संख्या बघता प्रशासनाने पुढील कार्यवाही करणे करावी असे आवाहन रशीद शेख यांनी केले. एके काळी मालेगाव हा नाशिक जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉट च्या नावाने ओळखला जात होता. मालेगावमध्ये कोरोनाने चांगलच थैमान घातल होत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती आणि त्यामुळे मालेगावला अतिरिक्त बेड्स आणि डॉक्टर्सची गरज होती. अशा वेळी तेथील रुग्णांना नाशिक आणि धुळ्यात उपचारासाठी आणण्यास विरोध करण्यात आला होता. तरीही मालेगावकरांनी खंबीरपणे उभं राहून कोरोनाचा सामना केला.