दिलासदायक; मालेगावमध्ये कर्तव्यावर असणारे ९६ पोलीस कोरोनामुक्त

नाशिक(प्रतिनिधी): मालेगावमध्ये आपला जीव धोक्यात घालून लोकांच्या रक्षणासाठी झटणाऱ्या अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र त्यापैकी ९६ जणांनी कोरोनावर मात केल्याची बातमी आली आहे. आणि ही बातमी मालेगावसाठी तसेच पोलीस खात्यासाठी दिलासा देणारी आहे. या सगळ्या कोरोना योध्यांचं ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. अजून उर्वरित पोलिस उपचार घेत आहेत.

मालेगावातील तब्बल ९६ कोरोनाबाधित पोलिसांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांमध्ये नाशिक ग्रामीण दलाचे ४३ पोलीस,जालना एस.आर.पी.एफ.चे ३८ पोलीस, औरंगाबाद एस.आर.पी.एफ.चे ५, अमरावती एस.आर.पी.एफ.चे ६, मरोळ आणि धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे २ व जळगाव पोलीस दलातील ०२ असे एकूण ९६ पोलिसांनी कोरोनावर मात करून उपचारा अंती बरे झाले. यातील काही पोलीस योद्धा बरे होऊन पुन्हा ड्युटी वर’ हजर राहून आपले कर्तव्य बजावता आहेत.

या योद्धांचे कौतुक करत,नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंग यांनी कोरोनामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी कोरोनाचा सामना आपण सर्व एकजुटीने करू असा संदेश पोलीस अधीक्षक मॅडम यांनी दिला. कोरोनावर मात करून बरे होणाऱ्यांची संख्या हि मोठ्या प्रमाणात आहे, व उर्वरित रुग्णही लवकरच बरे होतील यामुळे पोलिसांमध्ये समाधानकारक वातावरण आहे.