सिव्हील हॉस्पिटलमधून पळवून नेलेली ती चिमुरडी अखेर सापडली

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्हा रुग्णालयातून काही दिवसांपूर्वी एका बालिकेला एका अज्ञात इसमाने पळवून नेले होते. मात्र तिचा शोध लागत नव्हता. मंगळवारी (दि. १६ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास सीबीएस परिसरात सरकारवाडा पोलिसांना हि बालिका आढळून आली. ज्या व्यक्तीने तिला पळवून नेले होते, त्याने या चिमुरडीला या ठिकाणी सोडून पळ काढल्याचं लक्षात येतंय.

या व्यक्तीचा चेहरा सिव्हील हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीमध्ये दिसला होता. पोलीस आता त्या व्यक्तीचाही शोध घेत आहेत.