नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हॉटेल याहो सील !

नाशिक (प्रतिनिधी): कॅनडा कॉर्नर, जुन्या पोलिस आयुक्त कार्यालयासमोरील हॉटेल याहोवर पालिकेच्या पथकाने शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास छापा टाकला असता या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन तसेच विनामास्क गर्दी जमल्याचे दिसले. त्यास अटकाव केला असता पालिकेच्या पथकाशी हुज्जत घालण्यात आल्याने कठोर कारवाई करत हे हॉटेल सील करण्यात आले.

तसेच २५ हजार रुपये दंड करण्यात आला. या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या पथकाशी हुज्जत घालण्याचा गंभीर प्रकार घडला.