म्हणून पेटीएम अँप गुगल प्ले स्टोअर वरून हटवले….

नाशिक (प्रतिनिधी) : डिजिटल व्यवहारासाठी वापरले जाणारे पेटीएम अँप गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहे. आता हे अँप गुगल स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार नाहीये. त्यामुळे लाखो पेटीएम युजर्सना धक्का बसला आहे. पेटीएमने मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन केल्यामुळे हे अँप गुगल प्ले स्टोअरवरून हटवले गेले असल्याची प्राथमिक माहिती गुगल प्ले स्टोअरने दिली आहे.

गुगल प्ले स्टोअरने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन जुगार किवा विविध खेळांवरील सट्टेबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही अँपला आम्ही जाहिराती किंवा प्रमोशन देऊ शकत नाही. याव्यतिरिक्त इतर कोणतेही अँप जे रोख बक्षिसे किंवा पैसे जिंकण्याबाबत आश्वासन देतात त्यांची जाहिरात आम्ही करत नाही म्हणून पेटीएमला प्ले स्टोअर वरून हटवण्यात आले आहे.