नाशिकच्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह ! शहर- एकूण 27 रिपोर्ट्स निगेटिव्ह !

तर आज मालेगावचे 10 रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत.

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यासाठी आजचा दिवस खऱ्या अर्थानी दिलासादायी आणि चांगला ठरला आहे. आज (26 एप्रिल 2020) मालेगावचे 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर नाशिक शहरातले दोन रुग्ण जे पॉझिटिव्ह होते त्यांचे रिपोर्ट्स आता निगेटिव्ह आले आहेत. नाशिकचे एकूण 27 रिपोर्ट्स निगेटिव्ह तर मालेगावचे एकूण 10 रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. त्याची वर्गवारी पुढीलप्रमाणे..

नाशिक शहर:
झाकीर हुसेन हॉस्पिटल: 4 निगेटिव्ह
खासगी हॉस्पिटल: 2 निगेटिव्ह
सिव्हील हॉस्पिटल: 21 निगेटिव्ह
मालेगाव: 10 निगेटिव्ह

नाशिक शहरातील ज्या पॉझिटिव्ह रुग्णांचे रिपोर्ट्स आता निगेटिव्ह आले आहेत, त्यांचा उद्या एकसरे काढून मग त्यानंतर डिस्चार्ज बाबत निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.