गोदावरी नदीच्या कॉक्रीटीकरणमुक्त कामास प्रारंभ

नाशिक (प्रतिनिधी): धार्मिक महत्त्व असलेल्या श्री गोदावरी नदी पात्राला कॉक्रीटीकरणमुक्त करण्याच्या कार्याचा अखेर प्रारंभ झाला आहे. नाशिक स्मार्ट सिटीतील गोदा प्रोजेक्ट अंतर्गत हे काम होत आहे. या कामासाठी प्रदीर्घ लढा देणारे गोदाप्रेमी सेवा समितीचे देवांग जानी यांनी ही माहिती दिली.  दुतोंडया मारुतीपासून काँक्रीट काढण्याच्या कामास प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात, दुतोंडया मारुती पासून ते गाडगे महाराज पुलापर्यंत करण्यात येणार आहे.

श्री गोदावरी नदी पात्रातील नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणाऱ्या तथा पुराची तीव्रता अधिक करणाऱ्या कुंडातील पायऱ्यारुपी कॉक्रीटची भिंत तसेच १७ प्राचीन कुंडांपैकी पहिल्या टप्प्यात पाच (५) कुंड  १) अनामिक कुंड,  २) दशाश्वमेघ कुंड ३) रामगया कुंड, ४) पेशवे कुंड आणि ५) खंडोबाच्या कुंडांतील तळातील (रिव्हर बेड)  सिमेंट-कॉक्रीट काढून सदर कुंडे पुनर्जीवित करण्यात येणार आहे.