Gmail आणि Youtube भारतात डाऊन.. गुगल ने दिले स्पष्टीकरण..

नाशिक (प्रतिनिधी): युट्यूब आणि जीमेलच्या वेबसाइट्स गेल्या काही मिनिटांपासून भारतात डाऊन झाल्या आहेत.. लोकप्रिय वेबसाइट ‘डाउन डिटेक्टरच्या’ मते, युट्यूब, जीमेल, गुगल आणि गुगल ड्राईव्हसह बऱ्याच गुगल सेवा अनेक युझर्ससाठी ओपन होत नाहीयेत.. भारताव्यतिरिक्त इतर काही देशांमध्येसुद्धा जीमेल आणि युट्यूब डाऊन आहेत. गुगलला याबाबतीत समजताच त्यांनी याबाबत अपडेट दिली आहे.

असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि आपल्या धैर्य आणि सतत समर्थनाबद्दल धन्यवाद. सिस्टमची विश्वसनीयता ही Google वर सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही आमच्या सिस्टमला अधिक चांगले करण्यासाठी निरंतर सुधारणा करीत आहोत, ”असे अॅ प स्टेटस अपडेटमध्ये गुगलने सांगितले.