नाशिक (प्रतिनिधी): जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्त चोरीप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित विजय दत्तात्रय भागवत या संशयितास न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय ठाकरे यांच्या फिर्यादीनुसार संशयित सुनील गजानन पवार (रा. पंचक, जेलरोड) यांनी २५ फेब्रुवारीला कार्यालयीन वेळेनंतर दुय्यम निबंधक कार्यालयातील कायमस्वरुपी जतन करायचे अंगठे, पुस्तके व इतर महत्त्वाचे दस्तऐवज संबंधित अधिकारी किंवा वरिष्ठांच्या परवानगीशिवाय नेले होते. याप्रकरणी ४ मार्च रोजी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयातील दस्त चोरी प्रकरणात भागवतला कोठडी
2 years ago