Breaking: संपूर्ण नाशिक शहरात ह्या दोन दिवशी पाणीपुरवठा नाही…

Breaking: नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याबाबत अतिशय महत्वाची बातमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नाशिक महापालिकेने महत्वाची माहिती दिली आहे.

मनपाचे गंगापुर धरण रा. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील अ१३२ के. व्ही. सातपुर ब) १३२ के. व्ही. महिंद्रा या दोन एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ के. व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे…

व मुकणे धरण रॉवॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथुन ३३ के.व्ही वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे.

👉 हे ही वाचा:  पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

सदरचे केंद्रांवरील महावितरणकडुन ओव्हरहेड लाईन व सबस्टेशनची पावसाळापुर्व कामे करणे करीता त्यामुळे शनिवार दि.२१/०५/२०२२ रोजी सकाळी ०९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपावेतो वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

त्यामुळे नाशिक पश्चिम व पंचवटी विभागामार्फत जलशुध्दीकरण केंद्रांकडे जाणारी अशुध्द पाण्याची मुख्य गुरुत्ववाहीनी गोदावरी नदीच्या उजव्या व डाव्या बाजुला दुरुस्त करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नविन नाशिक सातपुर विभागामार्फत अशुध्द पाण्याची मुख्य गुरुत्ववाहीनी दुरुस्त करण्यात येणार आहे. 

सबब सदर दोन्हीही ठिकाणाहून होणारा पुर्ण शहराचा पाणीपुरवठा शनिवार दि. २१/०५/२०२२ रोजी बंद ठेवून उपरोक्त नमुद कामे करता येणे शक्य होणार आहे. तरी मनपाचे मनपाचे गंगापुर धरण व मुकणे धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा शनिवार दि.२१/०५/२०२२ रोजीचा दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही तसेच रविवार दि. २२/०५/२०२२ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेने केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790