Breaking: नाशिकला सातपूर परिसरात तरुणावर गोळीबार करत जिवघेणा हल्ला

Breaking: नाशिकला सातपूर परिसरात तरुणावर गोळीबार करत जिवघेणा हल्ला

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील सातपूर येथील कार्बन नाका परिसरात असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ तरुणावर जिवघेणा हल्ला झाला आहे.

आपापसातील जुन्या वादातून तिघांनी तरुणावर गोळीबार तसेच कोयत्याने वार केले.

यानंतर मारेकऱ्यांनी आपले वाहन घटनास्थळी सोडून कामगाराला धाक दाखवत त्याच्या दुचाकीने पळ काढला. ही सिनेस्टाईल घटना आज, रविवारी (ता. १९) दुपारी घडली.

🔎 हे वाचलं का?:  लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय, आदिती तटकरे यांची पोस्ट नेमकी काय?

रविवारी दुपारी तपन जाधव आपल्या चारचाकीमधून (MH 04 EX 5678) प्रवास करत असताना कार्बन नाका परिसरात संशयित आरोपी आशिष जाधव आपल्या २ साथीदारांसह (MH 15 DM 7639) या वाहनातून येत तपनच्या गाडीला धडक दिली. यानंतर गाडीखाली उतरत त्याच्यावर कोयत्याने वार केले यासह गोळीबार केला. तिघांनी मिळून केलेल्या या हल्ल्यात तपन जाधव आणि राहुल पवार गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयातउपचार सुरु आहेत.

🔎 हे वाचलं का?:  दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध

कामगाराची दुचाकी पळवली:
घटनेनंतर धडक बसल्याने आरोपींची गाडी बंद पडली होती. यामुळे त्या मार्गावरुन जाण्याऱ्य़ा एका कामगाराला आरोपींनी थांबवले. बंदूक अन् कोयत्याचा धाक दाखवत त्या कामगाराची दुचाकी (MH 15 FU 7656) घेऊन आरोपींनी घटनस्थळावरुन पळ काढला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790