नाशिक (प्रतिनिधी): पतीने त्यांच्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना संभाजी स्टेडियम समोरील एका बंगल्यात घडली दरम्यान सदर घटनेनंतर पतीला चक्कर आल्याने तो खाली पडला त्यांना खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले..
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष कौशिक (अंदाजे वय ६०,रा. शिव बंगला,संभाजी स्टेडियम समोर अश्विन नगर,नवीन नाशिक) यांनी (दि. १६) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घरातील बेडरूम मध्ये त्यांची पत्नी ज्योती आशिष कौशिक ( ५४) यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत गंभीर जखमी केले.
त्यानंतर बेडरूमच्या बाहेर जात आशिष यांनी त्यांचा मुलगा देव आशिष कौशिक याच्यावरही शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला; मात्र देव हा आईच्या खोलीत पळाल्याने तो बचावला.
नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
दरम्यान बेडरूममध्ये गेल्यावर देव ने त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली बघताच त्याने त्याच्या नातेवाईकांना सदर घटनेची माहिती देत मदतीसाठी बोलावले.
- नाशिक: किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू
- नाशिकहून गोवा, अहमदाबाद व नागपूरसाठी विमानसेवा सुरु; असे आहे वेळापत्रक
त्यांचे नातेवाईक घरी आल्यानंतर देव ने बेडरूमच्या बाहेर येऊन बघितले असता आशिष हे जमिनीवर पडलेले त्याला दिसून आले. दरम्यान आशिष व ज्योती यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी आशिष यांना तपासून मयत घोषित केले. दरम्यान आशिष यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. तर ज्योति कौशिक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण शेवाळे,उपनिरीक्षक उत्तम सोनावणे करत आहेत.