नाशिक शहरात दोन ठिकाणी वाहनांची जाळपोळ..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये दोन वेगवेळ्या घटनांमध्ये दोन वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. जेलरोड भागात एक दुचाकी तर सिडको भागात एक चारचाकी वाहनाची अज्ञात समाज कंटकांकडून जाळपोळ करण्यात आली असून नाशिक पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

नाशिकरोड – जेलरोड भागातील ब्रह्मगिरी कॉलनी, माणिकगड सोसायटीत राहणारे, नरेंद्र शंकर पगारे यांची MH 15 FB 8640 ही ऍक्टिव्हा दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून जाळली आहे. दि. १५ जून रात्रीच्या सुमारास ही घटना घडलीए याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. तर दुसरी घटना ही सिडको भागात समोर आली आहे, सप्तशृंगी चौक, अतुल डेअरी मागे, उत्तमनगर याठिकाणी एका चार चाकी वाहनाची अज्ञातांकडून जाळपोळ करण्यात आली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दोन्ही घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून ह्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर गजाआड करावे अशी मागणी नागरिक करत आहे..