पत्नीच्या आ’त्म’ह’त्ये’नंतर दीड महिन्याने दोन जुळ्या चिमुकल्यांसह पतीचीही आ’त्म’ह’त्या

पत्नीच्या आ’त्म’ह’त्ये’नंतर दीड महिन्याने दोन जुळ्या चिमुकल्यांसह पतीचीही आ’त्म’ह’त्या

नाशिक (प्रतिनिधी): दीड महिन्यापूर्वी पत्नीने आ’त्म’ह’त्या केल्यानंतर तीन वर्षांच्या दोन जुळ्या मुलांना सांभाळायचे कसे या विवंचनेतून पतीनेही आपल्या दोन मुलांसह खाणीच्या पाण्यात उडी घेत आ’त्म’ह’त्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता सय्यदपिंप्री येथे उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शंकर गुलाब महाजन (३४) आणि पृथ्वी व प्रगती (वय ३ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सय्यदपिंप्री शिवारात खदान परिसरात पाण्यावर तीन मृ’त’दे’ह तरंगताना नागरिकांना आढळून आले. पोलिसांनी मृ’त’दे’ह पाण्याबाहेर काढले. काही अंतरावर दुचाकी, आणि चप्पल पडलेल्या आढळून आल्या. मृताजवळ असलेल्या आधारकार्डच्या आधारे ओळख पटली. हा मृ’त’दे’ह शंकर महाजन (रा. भगतसिंगनगर, ओझर) यांचा आणि त्याच्या दोन जुळ्या मुलांचा असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशी केली असता मयत हे यावल (जळगाव) येथील रहिवासी होते. सध्या ते ओझर येथे वास्तव्यास होते. वरिष्ठ निरीक्षक सारिका आहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

पत्नीने केली होती आ’त्म’ह’त्या:
मयत शंकर हे जऊळके येथे पत्नीसह वास्तव्यास होते. दोघेही कंपनीमध्ये नोकरी करत होते. कोरोनामध्ये नोकरी गेल्याने दोघे दाम्पत्य घरीच होते.

दीड महिन्यापूर्वी शंकर यांच्या पत्नीने आ’त्म’ह’त्या केली. दिंडोरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. तेव्हापासून शंकर हे वैफल्यग्रस्त झाले होते. मिळेल तेथे बदली चालक म्हणून ते जात होते. मुलांना सांभाळ करण्यासाठी ओझर येथे राहणाऱ्या पत्नीच्या आईकडे ठेवत होते. सोमवारी (दि. ६) ते मुलांना घेऊन कुणास न सांगता घरातून निघून गेले. सय्यदपिंप्री शिवारात खदानमध्ये पाण्यात मुलांसह आ’त्म’ह’त्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

मृत्यूचे कारण स्पष्ट नाही:
मृ’त’दे’हाची ओळख पटली आहे. या मृताच्या पत्नीने दीड महिन्यापूर्वी आ’त्म’ह’त्या केली आहे. लहान मुलांचा सांभाळ कसा करावा यातून आ’त्म’ह’त्या केली असावी असा कयास आहे. अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे. तपासामध्ये कारण स्पष्ट होईल. – सारिका आहिरराव, वरिष्ठ निरीक्षक, तालुका पोलिस ठाणे तपास सुरु आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here