नाशिक हादरलं! आधी पत्नीचा गळा चिरला, नंतर पतीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या

नाशिक हादरलं! आधी पत्नीचा गळा चिरला, नंतर पतीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या अंबड परिसरात सकाळी उद्योजकाची धारदार शस्रांने हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता पंचवटी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे.

नाशिकच्या म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हि घटना घडली आहे.

पती पत्नीच्या आपसी वादातून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शी पोलिसांनी सांगितले.

घरगुती वादातून पतीचा बायकोवर संशय असल्याने बायकोला सतत त्रास देत होता.

या वादाचे पर्यावसान गंभीर घटनेत झाले. यावेळी पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करत स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हि घटना दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली आहे. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

राजू रतन सिंग ठाकूर आणि संध्या ठाकूर अशी म्हसरुळच्या परिसरात राहणाऱ्या पती पत्नीची नावे आहेत. हे दोघे घरी असताना त्यांच्यात कौटुंबिक वादातून भांडण झाले. या भांडणातून राजू ठाकूर यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. सुरवातीला राजू रतन सिंग ठाकूर याने आपली पत्नी संध्या ठाकूर हिच्या गळ्यावर वार केला. यानंतर स्वतः तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उडी घेत जीवन संपविले आहे. सुदैवाने यात घटनेत त्याची पत्नी गंभीर जखमी असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

नक्की काय घडलं:
राजू रतनसिंग ठाकूर (50) रा. लक्ष्मी रेसिडेन्सी, रामकृष्णनगर मखमलाबाद शिवार यांचा त्यांची पत्नी संध्या ठाकूर हिच्याशी कौटुंबिक कारणावरुन वाद झाले. भांडण विकोपाला गेल्याने राजू ठाकूर यांनी पत्नीवर चाकूने वार केले. आणि स्वत: तिसर्‍या मजल्यावरील सदनिकेच्या बाल्कनीत जाऊन खाली उडी घेतली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली असून, उपचारार्थ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

कौटुंबिक वाद गेले विकोपाला:
अलीकडे नाशिक शहरात कौटुंबिक वादाच्या घटना उघडकीस येत आहेत. यातून मारहाण, चाकु हल्ला इत्यादी प्रकार घडत आहेत. अशा घटना म्हणजे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याचे लक्षण आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here