नाशिक: स्कूल बसच्या चाकाखाली येऊन ८ वर्षीय बालिकेचा मृत्यू

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: स्कूल बसच्या चाकाखाली येऊन ८ वर्षीय बालिकेचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): स्कूल व्हॅनमधून उतरल्यानंतर त्याच स्कूल व्हॅनच्या चाकाखाली आल्याने आठ वर्षीय बालिकेचा करुण अंत झाल्याची ह्रदयद्रावकघटना नाशिक शहरात घडली आहे.

स्कूल व्हॅनमधून घरी जाण्यासाठी चिमुरडी उतरली खरी, मात्र घरी जात असताना त्याच स्कूल व्हॅनच्या मागच्या चाकाखाली येऊन आठ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' वाहतूक मार्गांत आज (दि. २६) महत्वाचे बदल

अपेक्षा नवज्योत भालेराव असे या चिमुकलीचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांनी संतापही व्यक्त केला आहे.

चालकाने अचानक गाडी रिव्हर्स घेतली आणि…:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नाशिक शहरातील जेलरोड भागातील पवारवाडी परिसरात घडली आहे. अपेक्षा नवज्योत भालेराव असे या आठ वर्षीय चिमुरडीचे नाव आहे. ही चिमुरडी शहरातील एका मराठी शाळेत शिकायला होती. तिला ने-आण करण्यासाठी पालकांनी स्कूल व्हॅनची सोय करुन दिल्याने ती रोज या स्कूल व्हॅनने ये जा करत होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवांना बळी पडू नका - जिल्हाधिकारी

दरम्यान तिला स्कूल व्हॅन घरी सोडण्यासाठी आली होती. स्कूल व्हॅनमधून अपेक्षा खाली उतरुन व्हॅनच्या पाठीमागून घरी जात होती. त्यावेळी व्हॅन चालकाने अचानक गाडी रिव्हर्स घेतली. त्यामुळे मागच्या चाकाखाली सापडून अपेक्षा गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत व्हॅनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790