नाशिक शहरातील ४ मार्गांवर महिलांसाठी सकाळ-सायंकाळी विशेष बस
नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेच्या ‘सिटीलिंक-कनेक्टिंग नाशिक’ या बससेवेचा तोटा भरून काढण्यासाठी विविध प्रयोग केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून शहरातील चार मार्गावर महिलांसाठी सोमवार (दि. २५) पासून सकाळ आणि सायंकाळी स्वतंत्र बस धावणार आहेत.
अंबड ते तपोवन, गंगापूररोड ते निमाणी, निमाणी ते नाशिकरोड, नाशिकरोड ते निमाणी या चार मार्गांवर सकाळी ९.३० वाजता आणि सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी स्वतंत्र बस चालणार असल्याची माहिती सिटीलिंककडून देण्यात आली आहे.
१ मे पासून नाशिक दर्शन:
राज्य परिवहन महामंडळाने तोट्याचे कारण देत बंद केलेली नाशिक दर्शन ही बससेवा १ मेपासून पुन्हा सुरू केली जाणार आहे. सकाळी ७.३० वाजता ही बस निमाणी बसस्थानकातून मार्गक्रमण करणार आहे. रामकुंड, श्री काळाराम मंदिर, सीता गुफा, तपोवन, मुक्तिधाम, सोमेश्वर, बालाजी मंदिर, पांडवलेणी, अंजनेरी, नाणे संशोधन केंद्र, त्र्यंबकेश्वर असा प्रवास करून सायंकाळी ही बस परतणार आहे. त्याचे भाडे मात्र अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची बातमी
नाशिक: स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे टवाळखोरांचा धुडगूस
मस्तच… कर्मयोगीनगर, गोविंदनगरमध्ये आता रात्रीची घंटागाडी सुरू