नाशिक: रस्ता खचल्याप्रकरणी महापालिकेची ‘या’ नामांकित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस

नाशिक: रस्ता खचल्याप्रकरणी महापालिकेची ‘या’ नामांकित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने सध्या सर्वाधिक वर्दळीचा बनलेल्या गोविंदनगरचा रस्ता आर. डी. सर्कल येथे खचला.

यामुळे वाहनधारकांना मनस्तापाबरोबरच वाहतूक पोलिस व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना भर पावसात काम करावे लागले.

सर्कलजवळ गोविंदनगरच्या बाजूने डाव्या बाजूला असलेल्या ठक्कर बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सला बांधकाम विभाग व नगररचना विभागाने नोटीस बजावली.

हे ही वाचा:  नाशिक: एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

दरम्यान, रस्त्याचे काम करून देण्याची तयारी संबंधित बिल्डर्सने दर्शविल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

रविवारपासून शहर व परिसरात पावसाची संततधार आहे. पावसामुळे बांधकाम विभागाच्या रस्ते कामाचे पितळ उघडे पडले आहे. रस्त्यावरचा वरचा भाग उखडून खडी इतरत्र पसरली आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते खचण्याचे प्रकार होत आहे. गोविंदनगर ते सिटी सेंटर मॉल हा शंभर फुटी रस्ता भक्कम असताना सोमवारी (ता. ११) पावसात खचला. ज्या भागात रस्ता खचला तेथे कमर्शिअल बांधकामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्याने खड्ड्यातील माती ढासळू लागली.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

काही वेळानंतर रस्ताच खचल्याने वाहतूक बंद करावी लागली. वाहतूक ठप्प झाल्याने गोविंद नगर ते सिटी सेंटर मॉल पुलापर्यंत एकेरी वाहतूक करण्यात आली. बांधकाम विभागाने संबंधित बिल्डर्सला प्रकाराची कल्पना दिली. मंगळवारी (ता. १२) रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790