नाशिक: मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यापाऱ्यांना कारने चिरडले; एक ठार, एक गंभीर जखमी

नाशिक: मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यापाऱ्यांना कारने चिरडले; एक ठार, एक गंभीर जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकचे व्यावसायिक नितीन व बिपीन पटेल हे दोघे मित्र नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी तपोवन ते काठे गल्ली या रस्त्यावर बाहेर पडले.

तपोवानातून मॉर्निंग वॉक करून परतत असतांना लक्ष्मीनारायण पूल ओलांडल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या भरधाव मोटारीने या दोघांना जोरदार धडक दिली.

या धडकेत नितीन बबलदास पटेल (वय: ५३, राहणार गायत्रीकृपा बंगला, काठे गल्ली) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

तर बिपीन अंबालाल पटेल हे गंभीर जखमी झाले. तपोवन- काठे गल्ली हा रस्ता सकाळी जॉगर्सच्या गर्दीने फुललेला असतो.

या रस्त्यावर अनेक नागरिक मोठ्या संख्येने वॉक करण्यासाठी येत असतात. रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकारण झाल्याने या रस्त्यावर वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवितात. शनिवारी (दि. १४) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तपोवनकडून काठे गल्लीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या कार (एम.एच. १५, एचजी ०२०६) वरील संशयित चालक अरविंद कुमार शर्मा (रा. समतानगर) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत हयगयीने कर चालवून नितीन व बिपीन या दोघांना धडक दिली. या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना त्वरित जुना आडगाव नाक्याजवळील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून नितीन पटेल यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या बिपीन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

⚡ हे ही वाचा:  राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता; नाशिकला यलो अलर्ट

संशयित कारचालकाणे अपघातस्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जयशंकर चौफुलीजवळ नागरिकांनी रोखले आणि पोलिसांच्या हवाली केले.

रविवार कारंजावरील वाराही ट्रेडर्सचे संचालक नितीन पटेल यांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पटेल हे गेल्या अनेक वर्षांपासून या बाजारपेठेत सुकामेवा विक्रीचा व्यवसाय करत होते. दरम्यान वाहनचालक शर्मा याच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here