नाशिक: जिल्हा परिषदेच्या अभियंत्यास दीड लाख लाच घेताना अटक

नाशिक: जिल्हा परिषदेच्या अभियंत्यास दीड लाख लाच घेताना अटक

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्याला ठेकेदाराकडून दीड लाखाची लाच घेताना अटक करण्यात आली.

शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी ५ वाजता जिल्हा परिषद कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

अमोल खंडेराव घुगे (४३) असे या लाचखोर अभियंत्याचे नाव आहे.

हे ही वाचा:  नाशिक: देखावे बघण्यासाठी गर्दीच्या शक्यतेने 'या' भागातील वाहतूक मार्गात बदल !

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे शासकीय स्थापत्य ठेकेदार आहेत.

त्यांनी मौजे पाथरे (ता. सिन्नर) येथे नळ पाणी पुरवण्याचे काम नियमानुसार पूर्ण केले आहे. या कामाचे ४८ लाखांचे देयक बिल तयार करुन त्यांनी ते मंजूर करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर केले होते. संबधित शाखा अभियंता घुगे याने बिल मंजूर करण्यासाठी चार टक्के दराने एक लाख ९० हजारांची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख ५० हजार रुपये मागितले. त्यावर ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार विभागाच्या पथकाने सापळा रचला. अभियंता घुगे यास दीड लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. उपअधीक्षक अभिषेक पाटील, सुकदेव मुरकुटे, मनोज पाटील यांच्या पथकाने अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे, सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790