HomeAd

नाशिक: एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, संशयितांना झाली अटक

नाशिक: एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, संशयितांना झाली अटक

नाशिक (प्रतिनिधी): एटीएम सेंटर फोडून नुकसान करणाऱ्या संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंगाडा तलाव येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये हा प्रकार घडला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: घरफोडीच्या गुन्ह्यातील चार संशयित जेरबंद

या प्रकरणी शाहिद परवेज मुर्तुजा शेख (रा.मोमीनपुरा नागपुर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि मिलिंद नेहे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एटीएम सेंटरमध्ये तांत्रिक दुरूस्तीचे काम करत असतांना संशयिताने एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करत पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याने सेंटरचा लाॅक सेफ्टी दरवाजा तोडून नुकसान केले. नागरिकांच्या मदतीने त्याला कसेबसे पकडण्यात यश आले. पकडले. वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. एटीएम फाेडल्याच्या शहरातील यापूर्वीच्या घटना पडताळून पाहिल्या जात असून काही संशयित पाेलिसांच्या नजरेत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790