नाशिक: इनोव्हाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक: इनोव्हाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात अपघातांची मालिका थांबतांना दिसत नाहीये.

सिन्नर शिर्डी महामार्गावर इनोव्हाच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

इनोव्हा कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील फुलेनगर फाट्याजवळील पेट्रोल पंपावर जवळ हा अपघात झाला. या अपघातामध्ये वैभव अशोक कुलकर्णी (३८) व सुवर्णा अशोक कुलकर्णी (७०) रा. पंचवटी या मायलेकांचा मृत्यू झाला आहे.

त्यांचे मूळ गाव वावी आहे. फुलेनगर फाट्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरून दोघे फुलेनगरकडे हे दोघे जात होते. यावेळे शर्वरी लॉन्स समोरील रस्ता ओलांडत असतांना सिन्नरवरून शिर्डीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या इनोव्हा कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.दशरथ मोरे व नितीन जगताप करत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790