👉 Ad: Office On Rent At Canada Corner. Whatsapp For More Details.
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या जेल रोड परिसरात एका अजब गुन्ह्याची नोंद झाली आहे.
पत्नीने आपला भाऊ व प्रियकराच्या मदतीने स्वतःच्याच घरात चोरी करुन सुमारे सव्वासहा लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पत्नीची तक्रार करायला गेले अन्..:
जेल रोड परिसरातील बेला डिसूझा रोड येथे राहणारे फिर्यादी यांच्या माहितीनुसार, पत्नीचे प्रियकरासोबत असलेल्या प्रेम संबंधाची माहिती तिच्या आई- वडील व भाऊ यांना देण्यासाठी बुधवारी (ता. 15) फिर्यादी पत्नीसह, मुलगा, मुलगी असे टेंभुर्णी (जालना) येथे गेले होते. फिर्यादी टेंभुर्णी येथे गेल्यानंतर पत्नीच्या आई- वडिलांना तिच्या प्रेमसंबंधाबाबतची रेकॉर्डिंग ऐकवली. त्या ठिकाणी फिर्यादी व पत्नीच्या नातेवाइकांचे जोरदार भांडण झाले. तत्पूर्वी, घर दुरुस्त करण्यासाठी फिर्यादी यांनी बॅंकेतून चार लाख रुपये काढून घरात ठेवले होते. याची माहिती पत्नी, तिचा भाऊ व प्रियकराला होती.
शुक्रवारी (ता. 17) काम आटोपून फिर्यादी नाशिकला पोचले असता घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले व लोखंडी कपाट उघडे दिसले. दरम्यानच्या काळात पत्नी, तिचा भाऊ व प्रियकर यांनी घराचे कुलूप दगडाने तोडून पाच लाख 50 हजाराची रोकड, 70 हजाराचे मंगळसूत्र, तीन मोबाईल, चार साड्या असा सहा लाख 28 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार देण्यात आली आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9367,9347,9379″]
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२७१/२०२१, भारतीय दंड विधान ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खडके करत आहेत.