नाशिक: अल्पवयीन मुलीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी
नाशिक (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर आधी लैंगिक अत्याचार केले.
त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. त्याचप्रमाणे तिला व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले.
त्याच फोटोंच्या आधारे बदनामी करण्याची धमकी देणाऱ्या संशयिताविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांची माहिती आणि पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित सोहम वनमाळी (रा. टाकळीरोड) याने मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिचा लैंगिक छळ केला. मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवत नग्न व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले. तसेच वारंवार असे करण्याची धमकी देत पैशांची मागणी करत बदनामी करण्याची धमकी दिली.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: एका ‘कट’मुळे घडला मोठा अपघात, 4 मित्र जागीच ठार
कसारा घाटात अपघात: क्रुझवरील नियंत्रण सुटले, एक बालिका ठार तर ७ जखमी
नाशिक: रिक्षातील प्रवासाचा बहाणा करत लुटणाऱ्या दोन महिलांना अटक!