
नाशिककरांनो.. अतिशय महत्वाची बातमी: येत्या २ एप्रिलपासून लागू होणार वाहतुकीचा हा नियम !
नाशिक (प्रतिनिधी): नाशिककरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे.
नाशिक शहरात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
अनेकदा हेल्मेट नसल्यामुळे वाहनधारकांना अपघातात प्राण गमवावा लागतो.
त्यामुळे आता पोलिसांनी हेल्मेट बाबत अजून एक सक्तीचा नियम आणला आहे.
नाशिकमधील वाढत्या अपघाताच्या घटना लक्षात घेता पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती केली आहे. येत्या दोन एप्रिलपासून नाशकात दुचाकीवरील चालकासह मागे बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यात हेल्मेट अनिवार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा हेल्मेट परिधान करणे आवश्यक होणार असून ही मोहीम अधिक तीव्र स्वरुपात राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे, विनाहेल्मेट धारकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंप चालकांवर आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होणार आहे. त्यामुळे ही मोहीम अधिक तीव्र होणार असून नाशिककर या मोहिमेला कसा प्रतिसाद देतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
- टायरच्या गोडाऊनला भीषण आग… आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट…
- सासूवर अंत्यसंस्कार करून परतलेल्या विवाहितेसोबत घडला अनर्थ, घरी येताच तडफडून गेला जीव
- नाशिक: ३१ मार्चला रात्री १२ पर्यत ही बँक राहणार खुली!
विनाहेल्मेट दुचाकीस्वार आढळून आल्यास पाचशे ते हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे आजच हेल्मेट खरेदी करून घ्यावे असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
नाशिक शहरातील हेल्मेट सक्तीचा प्रश्न नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला होता. नाशिक शहरात वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्ती ही नियमानुसार करण्यात आल्याची माहिती गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली होती.
![]()


