छगन भुजबळांची १०० कोटींची संपत्ती जप्त ? किरीट सोमय्यांच्या दाव्याने खळबळ!
नाशिक (प्रतिनिधी): राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची 100 कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली आहे, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. केवळ छगन भुजबळच नाही तर माजी खासदार समीर भुजबळ यांचीही मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे, “ठाकरे सरकारचे मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांची 100 कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहे.”
किरीट सोमय्यांनी म्हटलं, आयकर विभागाने प्रेसनोट जाहीर केली आहे. समीर भुजबळ, छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ही सर्व संपत्ती बेनामी असून कोलकाताच्या कंपनीद्वारे खरेदी केली होती.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणात छगन भुजबळांनी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, आयकर विभागाने जी कारवाई केली आहे त्यातील संपत्ती आणि आपला काहीही संबंध नसल्याचं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
सिडकोमध्ये गुंडांची दह’शत: पायी जाणाऱ्याला दोघांकडून मा’र’हा’ण; प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २५ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
महत्वाची बातमी: नाशिक शहरात गुरुवारी (दि. २६ ऑगस्ट) या ठिकाणी होणार लसीकरण