हृदयद्रावक: इंदिरानगर परिसरात १२ वर्षीय मुलीचा बिल्डिंगवरून पडून मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील इंदिरानगर परिसरामध्ये एका १२ वर्षीय मुलीचा बिल्डिंगवरून खाली पडून मृत्यू झाला.

बुधवार (दि. २५ नोव्हेंबर) रोजी रोहिदास दामू बाविस्कर रा. चेतनानगर, इंदिरानगर यांची मुलगी विश्वा रोहिदास बाविस्कर (वय १२) ही खेळायला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, थोडा वेळ झाल्यानंतर आशियाना बिल्डिंग कर्मा हाईट्स वरून, काही तरी पडल्याचा आवाज आला. म्हणून बाविस्कर व त्यांच्या पत्नी काय पडले हे बघण्यासाठी खाली गेले. बिल्डींगच्या खाली लोकांची गर्दी जमली होती. दरम्यान बाविस्कर यांची मुलगी विश्वा ही खाली पडलेली आढळली. विश्वाच्या डोक्याला मोठ्या प्रमाणावर मार लागल्याने नाकातून व कानातून रक्त वाहत होते. विश्वाला तातडीने सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.