‘स्वच्छ सर्वेक्षण-२१’ साठी होम कम्पोस्टिंग उपक्रमात भाग घ्या – महापालिका आयुक्त

नाशिक (प्रतिनिधी) : स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये नाशिक शहराने उत्तम कामगिरी बजावली होती. त्यामुळे नाशिक शहराचा स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये संपुर्ण देशात 11 वा क्रमांक आला होता. परंतु नाशिक शहराचा समावेश देशातील पहिल्या दहा स्वच्छ शहरात व्हावा म्हणून स्वच्छ सर्वेक्षण 2021 या निमित्ताने आपल्याला अजुन एक संधी प्राप्त होत आहे. शहरातील कचऱ्याचे त्याच्या मुळ ठिकाणी व्यवस्थापन होणे आवश्यक असल्याने महापालिकेतर्फे सर्व नाशिककरांना आवाहन केले जात आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट करणे हे एक महत्वपुर्ण काम असुन कचऱ्याचे त्याच्या मुळ ठिकाणी योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. नागरिकांनी स्वत:हून या होम कंम्पोस्टिंग उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.