शहरात सोन साखळी चोरीचे सत्र सुरूच…

नाशिक (प्रतिनिधी) :  शहरात दिवसेंदिवस गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामध्ये चोरीचे प्रकार सुद्धा वाढत असल्याचे चित्र आहे. सिडकोतील मोरवाडी परिसरात घरासमोर काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचुन दोन चोरटयांनी पळ काढल्याची घटना घडली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भारती कुवर (रा. कार्तिकी सेक्टर) यांनी जबरी चोरीची तक्रार दाखल केली आहे.

भारती कुवर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास भारती कुवर या घरासमोरील अंगणात काम करत असताना दुचाकीवर दोन चोरटे आले. मागे बसलेल्या एकाने भारती यांच्या गळयातील दोन तोळे वजनाची ५२ हजार ४३४ रुपयांची पोत पॅंडलसह खेचुन नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .