नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील कोरोनाबाधीतांसाठी खाजगी रुग्णालयात किती बेड्स उपलब्ध आहेत यासाठी महापालिकेकडून हेल्पलाईन सुरु करण्यात आली होती. या हेल्पलाईनमुळे कोरोनाबाधीतांच्या नातेवाईकांना किती बेड्स शिल्लक आहेत ही माहिती मिळवता येत होती. शहरात सद्यस्थितीला २९० ऑक्सिजनचे, १४ व्हेंटीलेटरचे आणि आयसीयुचे ४२ बेड्स शिल्लक असल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. पण बेड्स उपलब्ध असूनसुद्धा कोरोनाबाधीतांच्या नातेवाईकांना बेड्स उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कोरोनाबाधीतांची हेळसांड होतेय. आणि काही रुग्णांना आपला जीव सुद्धा गमवावा लागतोय. त्यामुळे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
शहरात पुरेसे बेड्स असूनसुद्धा पालिकेच्या हेल्पलाईनवर तक्रारींचा भडीमार!
6 months ago