शहरात डेंग्यूचे रुग्णही वाढताय : खबरदारी घेण्याचे मनपाचे आवाहन

नाशिक (प्रतिनिधी) : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येते की काय? हा प्रश्न सगळ्यांचं पडलाय. मात्र दुसरीकडे कोरोना नियंत्रणात येत असताना डेंग्यूने तोंड वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे डेंग्यू हा सुद्धा प्रशासनासमोर पुन्हा एकद मोठं आव्हान उभं राहिलंय.

जुलै महिन्यात डेंग्यूचे 14 रुग्ण, ऑगस्ट मध्ये २८, सप्टेंबरमध्ये ३९ रुग्ण तर ऑक्टोबर महिन्यात ५६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना कुठेतरी नियंत्रणात येत असताना डेंग्यू सारख्या संसर्गजन्य आजारांवर सुद्धा उपाययोजना महापालिकेला करावी लागणार आहे. त्यासोबतच घराच्या आजूबाजूला जमलेले पाणी स्वच्छ करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले अहे.