शहरात कोरोनानंतर आता ‘सारी’ चा कहर ; आतापर्यंत आढळले २,४७२ संशयित….

नाशिक (प्रतिनिधी) : एकीकडे कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत चाललेला कहर कुठेतरी आटोक्यात येतोय तर दुसरीकडे ‘सारी’ या आजाराचं संकट समोर आलं आहे. कोरोना आणि सारी या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत. कोरोना संशयिताला जसं सुरुवातीला खोकला, ताप, सर्दी अशी लक्षणं दिसतात तसच सारीग्रस्त रुग्णांमध्येही हीच लक्षणं दिसतात. कोरोना आणि सारी रुग्ण सारखेच वाटतात.

व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन हे सारी या आजाराचे मूळ लक्षणं आहे. तसेच सारीग्रस्त व्यक्तीला श्वासोच्छवास घेण्यासाठी सुद्धा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याला दुर्लक्षित करणे योग्य नाही. महापालिकेच्या “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेत तब्बल २ हजार ४७२ सारीचे संशयित आढळून आले आहेत. त्यांची तपासणी केली असता एकूण ६१९ जणांना सारीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.