लस देण्यास उशीर झाला म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

नाशिक (प्रतिनिधी): आईला लस देण्यास उशीर झाला म्हणून मुलाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार नाशिकच्या पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात घडला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी मृणाल भालचंद्र घोडके याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजय मोतीराम देवकर हे रुग्णालयात काम करत होते. त्यावेळी मृणाल भालचंद्र घोडके हा त्यांच्याकडे आला. आणि “माझी आई लस घेण्यासाठी आली आहे, इतका वेळ का लागतोय” असा प्रश्न विचारात अरेरावीची भाषा केली. शिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी घोडके याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.