या भागांमध्ये गुरुवारी (दि.२९) संध्याकाळचा पाणीपुरवठा नाही!

नाशिक (प्रतिनिधी) : सातपूर भागातील धृवनगर, बळवंत नगर, गणेश नगर, रामराज्य, नहुष हे पाच जलकुंभ भरणाऱ्या मुख्य उर्ध्व वाहीनीला काल (दि.२७) पासून मोठया प्रमाणात गळती सुरु झाल्याने सदर पाईप लाईन दुरुस्तीचे काम ताबडतोब हाती घ्यावे लागत आहे. त्यामुळे खालील भागात उद्या गुरुवार (दि.29) संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. 

प्रभाग क्र.7 :- सहदेव नगर,आयाचीत नगर, दादोजी कोंडदेव नगर,  प्रमोद नगर गितांजली सोसायटी,शांती निकेतन सोसायटी, जुने पंपिग स्टेशन परिसर, एस.टी.कॉलनी परिसर, श्रमिक नगर, सोसायटी इत्यादी परीसरात

प्रभाग क्र.8 :-  बळवंत नगर, रामेश्वर नगर, सोमेश्वर कॉलनी, सदगुरु नगर, खांदवे नगर, पाटील लॉन्स गंगापुर ड, नवश्या गणपती परिसर, आनंदवली गाव परिसर, रामनगर, सावरकर नगर, नरसिंह नगर, गणेश नगर, निर्मल विहार, काळे नगर, विवेकानंद नगर, पाईपलाईन रोड परिसर व गुरुजी हॉस्पिटल मागील परिसर तरी याची नागरिकांनी नोंद घ्यावी व महानगरपालिकेस सहकार्य करावे.