म्हसरूळ परिसरात २१ वर्षीय तरुणीचा खून !

जयेश साबळे, महाराष्ट्र एक्स्प्रेस ग्रुप, नाशिक
शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ वर्षीय तरुणीचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणीचा मृतदेह मखमलाबाद रोडकडे जाणाऱ्या निर्जनस्थळी मार्गावरील पुलाजवळ आढळला.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मयत पूजा विनोद आखाडे (वय २१) ही काकड मळा, कृष्ण नगर, मोरे मळा, हनुमानवाडी या परिसरातील रहिवाशी होती. मंगळवारी (दि.१९ जानेवारी) रोजी रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास या तरुणीचा मृतदेह अश्वमेध नगर कडून मखमलाबाद रोडकडे जाणाऱ्या निर्जनस्थळी मार्गावरील पुलाजवळ आढळून आला. पोलिसांना माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जागेचा- पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला असून याबाबत अधिक तपास सुरू आहे,संशयित प्रियकर किंवा पती असल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवत आहे.खुनाच्या घटनेने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे…