नाशिक (प्रतिनिधी) : पंचवटी परिसरातील पेठरोड नजीक शनी मंदिराजवळ अजब चोरीचा प्रकार घडला आहे. रविवारी (दि.०९) रात्रीच्या वेळी रिक्षाचालक बाळू मुठाळ रिक्षा स्टॅन्ड जवळ उभे होते. त्यांनी संशयित आरोपी संतोष आंधळे (वय ३०, रा. दिल्लीवाले म्हशीच्या गोठ्या शेजारी, दत्तनगर, पेठरोड, पंचवटी) याला जत्रा हॉटेल पर्यंत सोडले असता “तू मला रिक्षातून घेऊन येत असतांना माझा मोबाईल चोरला आहे.” असे म्हणून रिक्षाचालकास बाळू मुठाळ यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आणि रिक्षाला चावी असल्याचे पाहून रिक्षाच घेऊन पळून गेला. याप्रकरणाविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक चोपडे पुढील तपास करत आहेत.
मोबाईल चोरीचा आरोप करून रिक्षाच पळवून नेली…
3 years ago