मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ…

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकच्या मालेगाव परिसरात राहणाऱ्या विवाहितेला मुलगी झाली म्हणून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याची घटना समोर आली आहे.

तबस्सुम शेख शोएब (२२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती शोएब शेख भिकन, सासू सईदा शेख भिकन आणि दीर अदनान हे तिला मुलगी झाली म्हणून नेहमी सुनावत असत. तसेच काहीतरी कुरापत काढून तुला मुलगा होणार नाही असे म्हणत उपाशीसुद्धा ठेवत असत. घर घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये घेऊन ये असा तगादा लावत असल्याने या त्रासाला कंटाळून तिने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.