महामंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने जुन्या बस व भंगाराचा होणार लिलाव

नाशिक (प्रतिनिधी) : ह्या वर्षाच्या शेवटासोबतच राज्य परिवहन मंडळ जुन्या निकामी बस व अजून इतर भंगार साहित्याचा लिलाव करणार आहे. हा लीलाल ऑनलाईन पद्धतीने होणार असून महामंडळाला यामधून जवळजवळ  दोन कोटींचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

जुन्या व निकामी बसचा दरवर्षी लिलाव करण्यात येतो परंतु, मागील दोन वर्षांपासून हे लिलाव मात्र होऊ शकले नाही. हि लिलाव प्रक्रिया परिवहन मंडळाच्या कार्यशाळांमध्ये राबवली जाते. मागील वर्षांमध्ये हि प्रक्रिया खाजगी यंत्रणेच्या माध्यमातून केली जायची. मात्र याच वर्षी  ऑनलाईन लिलाव पद्धती वापरण्यात येणार आहे. राज्यात इतर ठिकाणी हि प्रक्रिया सुरु झालेली असून नाशिकमध्ये ती या महिना अखेरीपर्यंत घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेत १६० गाड्यांचा लिलाव होणार असून, पेठरोड येथे महामंडळाचे  वर्कशॉप असून त्याठिकाणी भंगार साहित्याचे लॉट लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.