नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी राजेंद्र त्र्यंबके यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. खा. शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नाशिक दौऱ्याच्या पूर्वसंध्येला ही बदली करण्यात आली. खरं तर त्र्यंबके यांच्याकडे असलेला हा पदभार प्रभारी स्वरूपाचा असल्याचे समजते. त्यांच्या जागी अहमदनगर जिल्हा परिषदेचे डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेचे आरोग्य अधिकारी राजेंद्र त्र्यंबके यांची तडकाफडकी बदली
2 years ago