पोलीस केस मागे न घेतल्याने चाकूने हल्ला

नाशिक (प्रतिनिधी): शहरात रोज कुठेना कुठे मारामारी किंवा धमक्या देण्याचे प्रकार घडत असतात. सातपूर पोलिसठाण्यामध्ये ज्ञानेश्वर गोमासे (व.२६) हे शिवाजी नगर सातपूर येथील रहिवासी असून  त्यांनी त्यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार नोंदवली आहे.

ते सकाळी जॉगिंग करत असतांना त्यांच्यावर विनोद बर्वे नावाच्या इसमाने हल्ला केला होता. सगुणा चिकन सेंटर समोर फिर्यादी जॉगिंग करत असतांना आरोपीने आपली गाडी फिर्यादीच्या अंगाला घासून  थांबवली. गाडीबाहेर येऊन ‘साईलीला बारची केस मागे घे नाही तर मी तुला जीवे मारील’ अशी धमकी त्या इसमाने दिली. व चाकू सारखे हत्यार बाहेर काढून फिर्यादीच्या डोक्यात मारत असतांना त्यांनी ते हाताने अडवले असता. त्यांच्या हातावर त्या हत्याराच्या जखमा झाल्या आहेत. म्हणून त्यांनी आपली तक्रार नोंदवली आहे.

हे ही वाचा:  नाशिक पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर कोयताधाऱ्यांचा धिंगाणा