नोकरीचे आमिष देत लावला १५ लाखाला चुना….

नाशिक (प्रतिनिधी) : नागपूर येथील ४ तरुणांना लष्कराच्या मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये हेल्परची नोकरी लावून देण्याचे आमिष देत १५ लाख गंडवले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक राजेश खोब्रागडे यांच्या फिर्यादीनुसार, वडिलांच्या ओळखीतील दीपक मोपीडवालने पुणे येथे मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेसमध्ये हेल्परची नोकरी लावून देतो. तरी त्यासाठी ७ लाख रुपये लागतील असे सांगितले. (दि.0४) रोजी अभिषेकसह अर्णव यादव, सैफउल्ला शफीउल्ला खान व बॉबी ओमकार हे नागपुरातील तरुण पुण्याला गेले. अभिषेक जवळील साडेपाच लाख, सैफउल्लाजवळील साडे चार लाख, मोपीडवाल्याच्या सांगण्यावरून सचिन पंडित या व्यक्तीच्या नावाने स्टेट बँकेत खाते नं. ८१७६०३२३१६ वर पाठवले. तर बॉबीने ७५ हजार रुपये रोकड त्यांच्याकडे दिली.

पुण्यात ८ दिवस अनेक कारण देऊन २२ ऑक्टोबरला देवळाली कॅम्प येथे मोपीडवाल्याच्या सांगण्यावरुन खंडेराव टेकडी परिसरात लष्करी गेटसमोर दत्ता सुर्वे या व्यक्तीची भेट घेतली. सूर्वेने सर्व कागदत्रांची झेरॉक्स प्रत घेऊन व्हेरिफिकेशन करून आणतो. असे सांगून पळ काढला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिस तक्रार केली. संशयित आरोपी सुर्वे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.