नोकरीची बोगस जाहिरात प्रसिद्ध करून, शिक्षिकेला लावला ३ लाखाचा चुना !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील एका शिक्षिकेला संकेतस्थळावर नोकरीची बोगस जाहिरात प्रसिद्ध करून, ३ लाख ४७ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरात सायबर गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. तरीही अनेक लोकं या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात.. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वेळोवेळी सायबर पोलिसांकडून देण्यात येतात…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया निकुंभ या शिक्षिका आहेत. प्रिया यांना शुक्रवारी (दि.३० ऑक्टोबर) रोजी एक फोन कॉल आला. दरम्यान फोनवर नोकरी डॉटकॉमवरून बोलत असल्याचे सांगत, तुम्ही ऑनलाइन अर्ज केला असून, संकेतस्थळाची लिंक पाठवत आहे. त्यावर बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डची माहिती भरा असे सांगण्यात आले. अर्ज भरल्यानंतर काही वेळात बँक खात्यातून ३ लाख ४७ हजार रक्कम काडून घेण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.