निंदनीय : कोरोना चाचणी करण्यासाठी गेलेल्या आरोग्यापथकातील महिलेला मारहाण !

नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून शहरात अनेक परिसरात कोरोनाची चाचणी घेण्यात येत आहेत. मागे काही दिवसांपूर्वी भद्रकाली परिसरात राहणारे सलीम तांबोळी यांचा कोरोना अहवाल पॉजीटीव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडल्यानंतर त्यांची आई कोरोनाबाधित असल्याचं समजलं. त्यामुळे त्यांच्या हाय रिस्क contact मध्ये असलेल्या घरातील इतरांची चाचणी करण्यासाठी महापालीकेच्या महिला आरोग्य पथकाला पाठवण्यात आले होते. घरात येऊन चौकशी करा असे सांगत सलीम यांनी दरवाजातच मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत महिला जखमी झाली असून या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सगळ्या प्रकारानंतर आरोग्यासेवकांवर हल्ला करणार्याची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.