नाशिक शहर लॉकडाऊन करण्याबाबत स्वत: मुख्यमंत्री निर्णय घेणार

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात कोरोनाबाधीतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन करावा कि नाही याबाबत चर्चा सुरु आहे. अर्थातच प्रशासन तसंच राजकीय नेत्यांमध्ये याबाबत मतभेदही आहेत. त्यामुळे आता यावर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील असं सांगण्यात आलंय..

येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री नाशकात दाखल होणार असून पालकमंत्री छगन भूजबळ, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याबरोबर बैठक घेणार आहे. या बैठकीअंती निर्णय जाहीर करण्यात येईल.

शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: दोन ते तीन दिवसांत नाशकात दाखल होणार आहेत. यावेळी ते पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील नामांकीत डॉक्टर्स व अर्थतज्ज्ञांशी चर्चा करुन ते लॉकडाऊनसंदर्भात निर्णय जाहीर करतील.