नाशिक शहरात शुक्रवारी (दि. ९ एप्रिल) कोरोना रुग्णांमध्ये वाढ; ३३ जणांचा मृत्यू

नाशिक शहरात शुक्रवारी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी ३७१२ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १९४२, नाशिक ग्रामीण: १६६६, मालेगाव: ५६ तर जिल्हा बाह्य: ४८ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात ३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ५, नाशिक ग्रामीण: २६ तर जिल्हा बाह्य २ असा समावेश आहे.

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे: १)सिडको कॉलनी,नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष, २) तिडके नगर, नाशिक येथील ७८ वर्षीय वृद्ध महिला, ३) धुर्वे नगर, सातपूर येथील ५६ वर्षीय महिला, ४) अंबड लिंक रोड, नाशिक येथील ४५ वर्षीय पुरुष, ५) विठाबाई सोसायटी, जाधव संकुल, कामठवाडे नाशिक येथील ४८ वर्षीय महिला यांचा समावेश आहे…

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक

तर शुक्रवारी नाशिक जिल्ह्यात ३२९५ इतके रुग्ण बरे झाले आहेत.